Monday 20 October 2014

Shivsena, BJP, NCP : शरद पवारांची गुगली

  ( खालचं कार्टुनसुद्धा नक्की पहा. )
शरद पवार नेहमी सांगत असतात कि, " स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मला राजकारणात आणलं. " परंतु हा माणुस इतका अप्पलपोटी आणि स्वार्थी असेल याची थोडी जरी शंका यशवंतरावांना आली असती तर त्यांनी शरद पवारांना पायाशीसुद्धा उभं केलं नसतं. शरद पवार म्हणजे फार राजकारणी माणुस ? तो कुणाला कसं खेळवेल हे कधीच कळत नाही ? असं अनेक जण म्हणतात. त्यांना लोक धुरंधर राजकारणीही  म्हणतात. पण शरद पवारांच राजकारण देशहिताच्या हिताच्या दृष्टीनं किती घातक आहे हे त्यांच्या कालच्या  खेळीवरून कळून येतं. कसं ते पहा - 
आपले स्वार्थ साधण्यासाठी पुलोद पासुन राष्ट्रवादीपर्यंत वेगवेगळे पक्ष स्थापण्यात आणि काँग्रेस मधुन आत बाहेर करण्यात शरद पवारांची हयात गेली. २६ खासदार असणाऱ्या गुजरातचा पंतप्रधान होऊ शकतो. पण पवारांच्या काळात ४८ खासदारांपैकी ४० - ४२ खासदार दिल्लीत पाठवुनसुद्धा त्यांना दिल्लीत हवा तसा सन्मान मिळाला नाही. कारण शरद पवारांचं मतलबी, पायापुरत, आणि गटबाजीच राजकारण काँग्रेसच्या धुरिणांना चांगलंच परिचित होतं.

आता परवाचंच पहा ना ! मी खात्री नं सांगतो युती आणि आघाडी तुटण्यात शरद पवारांचाच हात होता. कसा ते सांगतो. शरद पवारांना माहिती होतं कि काही झालं तरी यावेळी आघाडी ठेवूनही आपण सत्तेत येऊ शकत नाही. खासदारकीला आपण काँग्रेसपेक्षा वरचढ ठरलो आहोत. त्यामुळे काँग्रेस वर दबाव टाकुन हवं ते पदरात पाडून घ्या. ते नाही जमलं  तर आघाडी तोडा. आघाडी तोडतानाच युतीसुद्धा तुटली पाहिजे. मग सगळे स्वतंत्र लढतील. आणि प्रत्येकाला आपली ताकद कळेल. आपण काँग्रेसला धोबीपछाड देऊ आणि आपल्या बरोबरीला आणू.  हे सध्या झालं. 

निवडणुकीदरम्यान ते भाजपावर चौफेर टिका करत होते. मोदींवर तोंडसुख घेत होते. आणि उद्धव ठाकरेंची स्तुती करत होते. ' बाळासाहेबांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी खुप कष्ट घेतलेत. ' असं जाहीरपणे सांगत होते. कारण राष्ट्रवादी ६० च्या आसपास जागा मिळवेल. शिवसेनेचे ८० पेक्षा अधिक उमेदवार विजयी होतील आणि असे झाले तर आपण शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवायचे. चार सहा जागा कमी पडल्याच असत्या तर त्यांची जुळवाजुळव करणं हा पवारांच्या डाव्या हाताचा मळ होता. 

आता ओपिनिअन पोलचे आकडे समोर येताच मतमोजणीच्या आदल्या दिवशीच येणाऱ्या सरकारमध्ये राष्ट्रवादी भुमिका महत्वाची असेल असं जाहीर करून टाकतात. आणि मत मोजणीच्या दिवशी नऊ वाजायच्या आत आम्ही भाजपाला बाहेरून पाठींबा दयायला तयार आहोत. हे ही सांगतात. कारण शिवसेनेच्या संदर्भातला आपला अंदाज चुकला आहे भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणुन उदयास येणार आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. आहे की नाही मजा. प्रचारादरम्यान आपण भाजपावर टीका केली होती, भाजपाला आपण जातीयवादी हि उपाधी चिटकवली आहे. आपण स्वतःला धर्म निरपेक्ष म्हणवतो या कुठल्याही गोष्टीचा विचार ते करत नाहीत. आपण सगळे म्हणणार, " च्यायला शरद पवार ग्रेटच माणुस. या एका खेळीनं त्यांनी किती जणांना त्यांनी मात दिली ? एका दगडात किती पक्षी मारले ? " इत्यादी इत्यादी.

आणि खरंच त्यांच्या एकाच वक्तव्यान काय काय केलं ? 

१ ) भाजपाचा शिवसेनेकडे जाण्याचा मार्ग बंद करून टाकला.
२ ) शिवसेनेला आम्ही भाजपासोबत जाणार आहोत हे दाखवुन दिलं. 
३ ) यामुळे शिवसेनाला पुढाकार घेऊन भाजपाच्या दिशेने पाऊल टाकण्याऐवजी रुसून बसायला लावलं आणि
     बघ्याची भूमिका घ्याला भाग पाडलं. 
४ ) आपल्या या भुमिकेमुळे काँग्रेसलाही संभ्रमात पाडलं आणि वेळ आलीच तर आपण काँग्रेसला कधीही
     काडोमोड देऊ हे काँग्रेसला दाखवुन दिलं.     
५ ) या पुढे राष्ट्रवादीशी घरोबा करताना काँग्रेसला नरमाईचीच भुमिका घ्यावी लागेल असे संकेत दिले.
६ ) काँग्रेसला एकाकी पाडलं.
७ ) स्वतःला आणि आपल्या पक्षाला चर्चेत ठेवलं.

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे

८ ) भाजपा शिवसेना सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी नेत्यांची संभवनीय चौकशी टाळण्याचा पर्याय निर्माण केला.

९ ) पुढच्या वेळी आघाडी होऊ शकते पण युती होईलच असे नाही. म्हणजेच आपण आघाडी करायची भाजपा शिवसेनेला स्वतंत्रपणे लढायला लावायचं आणि पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आणायची या संधीची बीजं आजच पेरून ठेवली.  

म्हणजे कशात काही नसणाऱ्या शरद पवारांची इथपर्यंत मजल. नाही तर आमचे उद्धव ठाकरे सत्तेचं ताट समोर असताना युती तोडली. प्रचारादरम्यान चार दिवसापुर्वीच्या पंचवीस वर्ष जुन्या मित्रावर सडकून आणि कुठलाही ताळतंत्र नसलेली टिका केली. भाजपा अत्यंत संयमाने बोलत असताना हे मात्र संयम सोडून वागत राहिले. माझ्या दारात कुणीतरी प्रस्ताव घेऊन यावं म्हणुन वाट पहात बसले. 

वा रे पक्षप्रमुख ! ज्या माणसाला आपल्या पक्षाची ध्येय धोरणं नीट  ठरवता येत नाही. आपल्या पक्षाचं हित कशात आहे ते कळत नाही. मिशन १५१ प्लस म्हणताना १०० जागासुद्धा जिंकता येत नाहीत. तो माणूस महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार ? 

खरंतर हा सगळा मेंदू उद्धव ठाकरेंचा आहे असं मला अजिबात वाटत नाही. मागे वर्तमानपत्रात शिवसेनेतली आनंदीबाई कोण ? अशी बातमी झळकली होती. त्याचं उत्तर कोणीच दिलं नाही. दिलं असेल तरी मला माहित नाही. पण हि आनंदीबाई कोण असावी त्याविषयी लवकरच लिहिण. आणि हि आनंदीबाईच सगळ्या कारस्थानाच मूळ आहे. पण फरक कसा आहे पहा इकडे शरद पवार प्रफुल्ल पटेलांच्या मुखातुन बोलतात. तर तिकडे उद्धव ठाकरेंचा बोलविता धनी कुणी दुसराच आहे. अर्थात झाकली मुठ सव्वा लाखाची त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि त्यांचे तथाकथित शिवसैनिकही हे मान्य करणार नाहीत.

असो. भाजपा राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही असा मला विश्वास आहे. संघाची भूमिकाही शिवसेना आणि भाजपानं सोबत रहावं अशीच आहे. हे सारे स्पष्ट बोलताहेत. पण उद्धव ठाकरेंचं एकच, ' मी माझ्या घरीच बसलेलो आहे. त्यांनी त्यांचा प्रस्ताव घेऊन यावं. मग बघु काय करायचं ते.'

आता भाजपा उद्धव ठाकरेंकडे गेली कि शिवसेना कोणकोणते मुद्दे पुढे उभे करेल सांगता येत नाही. पण शिवसेना राजकारण टिकून रहायची असेल तर परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो हिच इच्छा.
    


    

10 comments:

  1. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री मला करा असा हेका धरला तर....?

    ReplyDelete
  2. आंबट गोड , प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. यापूर्वीही तुझी प्रतिक्रिया आली होती. असो उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा हेका धरला तर ' पहिले पाढे पंचावन्न ' म्हणणं एवढंच आपल्या हाती राहतं. पण शिवसेना तसं करणार नाही. शिवसेनेने तसं केलं तर राष्ट्रवादीचा पर्याय आहेच. पण तो स्विकारावा लागणं हे भाजपा शिवसेनेचं दुर्दैव असेल

    ReplyDelete
  3. कुणीतरी नार्वेकर आडनावाची ''आनंदीबाई" आसॅवी अशी शंका आहे .... खर आहे का हो...?

    ReplyDelete
  4. Ata kadhi kadhi asa watatey......ki BJP n congress ch yuti karayla pahije.......😜😜

    ReplyDelete
  5. मिलिंद नार्वेकर यांच्यासोबतच संजय राउत यांचही नाव घ्यावं लागेल.

    ReplyDelete
  6. एवढ निराश होण्याचं काही कारण नाही. कोणीही सोबत येवू दया भाजपाला विना अडथळा कामकाज करता यायला हवं आणि निर्णय घेता यायला हवेत. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  7. युती तुटली ती स्वतंत्र नागविदर्भाला भाजपने पाठिंबा दिल्यामुळ. शिवसेनेशी तडजोड होईल ती भाजपने नागविदर्भाला निस्संदिग्ध नकार दिला तरच.तात्पुरता नकार आणि मग होकार ही भाजपची खेळी असता कामा नये हा शिवसेनेचा आग्रह राहीलच. याशिवाय भाजपचे निम्मे आमदार एका महिन्यापूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. अटीतटीच्या प्रसंगी भाजप त्याना वेसण घालू शकेल काय याचा खुलासाही शिवसेना मागेलच.

    ReplyDelete
  8. मित्र प्रतिक्रियेबद्दल आभार. कदाचित भाजपाही विदर्भ स्वतंत्र करू इच्छित नसेल. कारण महाराष्ट्राच्या सत्तेची चावी सतत आपल्या हातात ठेवण्याचा तो एक मार्ग आहे याची जनिए भाजपाला आहे. पण शिवसेनेने कोणत्याही अटी शर्थी घालू नयेत. कारण सत्ता महत्वाची आणि सत्तेत राहून जनसेवा महत्वाची. पुन्हा पाच वर्ष सत्ता मिळविण्याचा तोच एक उपाय आहे.

    ReplyDelete
  9. जो आपल्या गुरूचा नाही तो जनतेचा तरी कसा ???

    ReplyDelete
  10. मित्रा या लेखावर अनेकांनी माझ्याशी इतका वाद घातला आहे कि विचारता सोय नाही. पण आपली प्रतिक्रिया इतकी सुरेख आहे कि त्या वाद घालणाऱ्या सगळ्यांना मस्त चपराक आहे. आभार.

    ReplyDelete