Friday 10 October 2014

Shiwsena On Facebook : फेसबुकवरची शिवसेना

मी अत्यंत वेगळ्या मनस्थितीत हा लेख लिहितो आहे. हा लेख लिहिताना कुणाच्याही भावना दुखवणं हा माझा हेतू नाही. कुणाविषयी अपशब्द वापरणं हाही हेतु नाही. पण ज्या तरुणाईवर मोदीजींचा दृढ विश्वास आहे तीच तरुणाई फेसबुकसारख्या सार्वजनिक व्यासपीठावर देशाच्या पंतप्रधानांविषयी अत्यंत अवार्च्य भाषेत प्रतिक्रिया देते हे पाहिलं कि प्रश्न पडतो,
' हि पिढी कशी घडवणार देश ?'

बरं हि मंडळी फेसबुक वापरतात म्हणजे अशिक्षित नसावीत. अगदी मोठया घरची नसली तरी मध्यमवर्गीय असावीत. झोपडपट्टीतली नसावीत. म्हणजे झोपडपट्टीतल्या मुलांवर संस्कार नसतात असे मला म्हणावयाचे नाही. ' चिखलात कमळ फुलावं ' त्याप्रमाणे तिथंही अनेक संस्कारक्षम मुलं असतात. मग फेसबुकवर अवार्च्य भाषेत प्रतिक्रिया देणारी हि मंडळी नेमकी कोणत्या मानसिकतेची असतात. खरंच त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या मनातून उमटल्या असतात कि नेत्यांनी त्यांचा पोपट केलेला असतो.

मान्य की तुम्ही शिवसेनेचे समर्थक असाल. पण आपल्या नेत्याचं समर्थन करायला आणि विरोधकांवर चिखलफेक करायला हिच भाषा वापरायला हवी का ? या शिवसेना समर्थकांना भाजपाच्या समर्थकांनी दिलेली उत्तरही मी पहात असतो. आणि शिवसेनेच्या अत्यंत अवार्च्य भाषेतील प्रतिक्रियांना भाजपाच्या समर्थकांनी दिलेली उत्तरं मात्र बऱ्याचदा अत्यंत सौम्य भाषेत असतात. मग शिवसेनेच्या समर्थकांच्या तोंडी हि भाषा येते कुठून ? हे वळण आई वडिलांचं तर मुळीच नसणार ? शिक्षकांनी सुद्धा हे धडे दिले नसतील ? समाजानही हे वळण लावलं नसेल ! मग कुठून येते शिवसैनिकांच्या तोंडी हि भाषा ?

खुप विचार केला तेव्हा लक्षात आलं, ' जसा नेता तसे कार्यकर्ते.' ' बाळासाहेबांच्या आदरापोटी आणि त्यांना श्रद्धांजली म्हनुन मी शिवसेनेवर टिका करणार नाही. '  असं मोदिजी जाहीर करतात. आणि खरंच तो शब्द पाळतात. पण उद्धव ठाकरे मात्र बेलगाम वारुसारखे वाट्टेल ते बराळताहेत. अफजल खानाची सेना काय ? आणि काय काय ? आपल्या वडिलांच्या वयाच्या आणि देशाचे पंतप्रधान असलेल्या व्यक्तीविषयी आदरभाव बाळगावा हे एका पक्षाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असणाऱ्या उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याला कळत नाही तिथं त्यांच्या तथाकथित शिवसैनिकांना कुठून कळणार ?

पण मित्रांनो दुसऱ्यावर चिखल फेकुन आपण स्वतःला महान ठरवू शकत नाही. उद्धव ठाकरे किती टोकाची भाषा वापरताहेत हे जनता पहाते आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या भाषणाचा कितीही उदो उदो केला तरी सर्वसामान्यांना ते हि भाषा, त्यांचं हे वागणं मुळीच पटण्यासारख नाही. त्याची फळं उद्धव ठाकरेंना मिळतीलच.

राज ठाकरेही तसेच. ते तर स्वतःला हुकूमशहाच समजतात. या देशात माझ्यासारखा दुजा कोणी नाही हि भावना त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होते. ते पत्रकारांना फटकारणार ? ते अधिकाऱ्यांना फटकारणार ? ते मोदींना फटकारणार ? का ?

शरद पवार आहेतच. अजित पवारही आहेतच. पण भरीसभर म्हणून कि काय सुप्रिया सुळेसुद्धा मोदींच्या विरुद्ध दंड थोपटणार. ' शरद पवार आणि अजित दादांविषयी बदनामीकारक एक शब्द जरी बोललात तरी गाठ राष्ट्रवादीशी आहे.' असं ठणकावणार. कशासाठी हि दादागिरी ? पण तेच आपले वडील आणि भाऊ मोदींच्या विरुद्ध बोलले तर त्यांचं समर्थन करणार ? वा रे आमचे नेते. आणि धन्य त्यांचे चेले.

जे फेसबुकवर तेच वाट्स अपवर ? तेच इतर ठिकाणी. लोकसभेला मोदींनी मिडीयाचा अत्यंत प्रभावी वापर केला. आज प्रत्येक पक्ष आणि त्यांचा कार्यकर्ता आपली मतं मांडताना सोशल मिडीयाचा वापर करतोय. पण यातुन आपले संस्कार उघडे पडु नये, आपल्या देशाची बदनामी होऊ नये म्हणून नेत्यांनी नाही पण कार्यकर्त्यांनी नक्कीच काळजी घ्यायला हवी.

आपल्या पुढे शिवजींच नाव लावणाऱ्या आणि शिवसैनिक म्हणून स्वतःला मिरवणाऱ्या शिवसैनिकांनी एवढी काळजी घ्यावी हीच प्रामाणिक इच्छा.



32 comments:

  1. Are kunala moorkh banvatoyes? Asli shuddh ani sayami bhasha vaprnyach dhong karun. Bhajpchya chamchya. Are bhajapcha prachar karaycha tar ughdpane kar na. Shevti tu aplya jatichyach umedvarala mat denar he saglyana mahit ahe. Are pracharachi patali kiti khali anli re. "Kuthe nevun thevlay Maharashtra majha".

    ReplyDelete
  2. Ata comment pan publish karnar nahi ka? Dum ahe ka ?

    ReplyDelete
  3. फारच छान झालाय लेख.

    ReplyDelete
  4. मित्रा मी माझं काम करतोय. कुणी आपल्या तोंडावर थुंकले तर लाज आपल्याला नव्हे थुंकणाऱ्याला वाटली पाहिजे . कारण त्याची कृती चुकीची असते. आणखी एक Shevti tu aplya jatichyach umedvarala mat denar he saglyana mahit ahe या आपल्या वाक्यावरून मी ब्राम्हण असेन आपणास वाटत असेल तर तो गैरसमज दूर करा. जातीपेक्षा, धर्मापेक्षा, भाषेपेक्षा, राज्यापेक्षा देश अधिक महत्वाचा.

    ReplyDelete
  5. मित्रा मी मी शिवसेनेचाच आहे. इतकाच काय पुणे महानगर पालिकेत माझी बहीण आणि भाऊ दोघेही शिवसेनेचे नगरसेवक आहेत. पण नगरसेवक झालोत ते उद्धव ठाकरेंमुळे किंवा शिवसेनेमुळे नव्हे स्वकर्तुत्वावर. हे सारं लिहिताना जर मी घाबरत नाही तर तुझी कॉमेंट पब्लिश करताना का घाबरू ? उलट तू तरी नावानिशी कॉमेंट दयायची होती.

    ReplyDelete
  6. आभार मित्रा. पण तुझ्या आधी आलेल्या दोन्ही प्रतिक्रिया बघ. बुद्धि भ्रष्ट झालेल्या माणसाला चांगल्या आणि वाईटातला फरक कळत नाही हे तुला दिसून येईल.

    ReplyDelete
  7. नरेश बारामतीकर10 October 2014 at 17:05

    खुप मस्त लिहिलं आहे तुम्ही. पण शिवसेनेत सगळेच असे नसतात. मीही शिवसेनेचाच कार्यकर्ता आहे. उद्धव ठाकरेंचं चुकतंय हेही कळतय. आणि म्हणूनच मी माझा निर्णय घेतलाय.

    ReplyDelete
  8. नरेश चांगल्या वाईट गोष्टी सगळीकडेच असतात. त्यामुळेच शिवसेनेचे चांगले कार्यकर्तेही नक्कीच असणार. तुम्ही स्वतः अशा कार्यकर्त्यांच एक उदाहरण आहात. पण फेसबुकवर शिवसेनेचा तुमच्यासारखा शंभरातून एखादाच कार्यकर्ता दिसतो. मी हे सारं लिहिलं आहे ते ९९ जणांमध्ये बदल घडावा म्हणून. असो प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

    ReplyDelete
  9. Tumcha mukhyamantri padacha davedar sanga. Mi tumchi jat sangto. 100 percent.
    Mi 100 percenx t sangto tumchya jatichya vote denar

    ReplyDelete
  10. ek goshta nakki- tumhi tumchya pasanticha mukhyamantripadacha Umedvar Sanga mi tumchi jat sangto. 100 % tumchya jaticha asnar. Mag ti kontika asena. (P.S. - mala var fakt brahmin caste mhanaychi nhavati.)

    ReplyDelete
  11. Pan tumhala tumchya jatichachya mansakade mukhyamantripad jave asech vatat asnar. Tase nasel tar apli pasanticha ek umedvar sangach.

    ReplyDelete
  12. मुख्यमंत्री कोणीही होऊ दे. सत्ता भाजपची यायला हवी. कारण साठ वर्षात भाजपाला जेमतेम पाच वर्ष सत्ता मिळाली आहे. आणि तो अनुभव फारसा वाईट नव्हता.

    ReplyDelete
  13. Enron. Purti. U.P. valyana marhan. Babri masjidivar tika. Mumbait 25 varsh satta asun dekhil kahich kel nahi. Apalya pora balanchi vyavastha keli zale.
    Mala pan congress rashtravadi nako ahe. Pan bjp valyana mat karnyapeksha umedvar baghun mat karave ase vatate

    ReplyDelete
  14. मित्रा तुझ्या सगळ्याच प्रतिक्रिया साधारणतः एकाच आशयाच्या होत्या म्हणुन इतर दोन्ही प्रतिक्रिया डिलीट केल्या. तसेच मी सतत माझ्या ब्लॉगवर बसलेलो नसतो त्यामुळे वाचकांच्या प्रतिक्रियेला उत्तर दयायला उशीर होतो.

    ReplyDelete
  15. मी माझा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सांगायचा आणि त्यावरून तू माझी जात ठरवायची. यापेक्षा मी माझी जात सांगतो. मी जातीनं धनगर आहे. आता मी जातीनं धनगर आहे म्हणुन भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर मुख्यमंत्री व्हावेत असे मला मुळीच वाटत नाही. हो आणि पहिल्या प्रतिक्रियेत तुझी जी भाषा होती त्यात खूप सुधारणा दिसली. मला ऐवढे पुरेसे आहे. असो. माझ्या ब्लॉगवरील इतरही पोस्ट वाच. तुझ्या प्रतिक्रिया कळू दे. आणखी एक माझ्या ब्लॉगच्या पानावर डाव्या बाजूला एक विंडो आहे तिथं मराठीत लिहूनही प्रतिक्रिया देता येईल.

    ReplyDelete
  16. Mala disli nahi window.

    ReplyDelete
  17. Prithviraj chavan baddal aple kay mat ahe. Mazya mate sarvat swach pratimecha to manoos ahe.( mi congresscha pracharak nahi).
    Pankja mundela prachatasathi ' vaparale) jat ahe ka?
    Nahitar bjp adhich C.M. cha umedvar jahir karte nehmi.

    ReplyDelete
  18. T म्हणजे True का मित्रा. आणखी एक रसिक वाचकांनी शक्यतो निनावी प्रतिक्रिया देऊ नयेत कारण ? मी नेमकं कुणासाठी प्रतिक्रिया दिली आहे. याचा संदर्भ इतर वाचकांना लागत नाही.

    ReplyDelete
  19. एक रसिक वाचकांनी शक्यतो निनावी प्रतिक्रिया देऊ नयेत कारण ? मी नेमकं कुणासाठी प्रतिक्रिया दिली आहे. याचा संदर्भ इतर वाचकांना लागत नाही.

    विधानसभेला आणि लोकसभेला पक्षच अधिक महत्वाचा. स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका यासारख्या ठिकाणी व्यक्ती बरोबरच पक्ष पाहुन मतदान करावे.

    ReplyDelete
  20. मित्रा रसिक वाचकांनी शक्यतो निनावी प्रतिक्रिया देऊ नयेत कारण ? मी नेमकं कुणाच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलं आहे याचा संदर्भ इतर वाचकांना लागत नाही.



    मराठीत लिहायचंय ? इथं लिहा. या शीर्षकाखाली असलेल्या विन्डीत आपण मराठी लिहू शकता. मराठीचे इंग्रजीतील स्पेलिंग लिहावे. उदा. ' कसे आहात ' याचे ' kase aahat ' असे लिहावे. लिखाण झाल्यानंतर कॉपी करून हवे तिथे पेस्ट करावे.

    ReplyDelete
  21. मित्रा रसिक वाचकांनी शक्यतो निनावी प्रतिक्रिया देऊ नयेत कारण ? मी नेमकं कुणाच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलं आहे याचा संदर्भ इतर वाचकांना लागत नाही.



    पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीने खूप ताकद लावलीय. पण पृथ्वीराज चव्हाण काही झाले तरी विजयी व्हायला हवेत असे माझे प्रामाणिक मत आहे. शरद पवारांनी आयुष्यभर पाडापाडीचे आणि फोडाफोडीचे राजकारण केले.



    विनोद तावडेंनी पंकजाताई सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात असे सर्वप्रथम म्हटले होते. पण ते त्यांचे वैयक्तित मत होते. मुळात पंकजाताईचा प्रचारासाठी वापर करावा अश त्यांची जनमानसात प्रतिमा नाही. मुंडे साहेबांच्या निधनामुळे महाराष्ट्रात सहानभूतीची लाट निर्माण व्हावी तशी झाली नाही. आणि मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. हे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. हो काही जहिरात कॉम्पेन मध्ये मोदीजींच्या बाजूला पंकजाताई दिसतात. पण तो त्यांचा वापर आहे असे मला वाटत नाही. ती स्वर्गीय मुंडेंना श्रद्धांजली असावी.

    ReplyDelete
  22. विजयभाई आगदी मनातले लिहीले आहे...

    ReplyDelete
  23. प्रशांतजी प्रतिक्रियेबद्दल आभार. यांचं चुकत नाही प्रशांत. चार महिन्यापूर्वी मोदींचा उदो उदो करणारी मंडळी हिच होती. त्यांचे नेते बदलले म्हणुन ते बदलले. मला राहुल गांधींची, मनमोहनसिंगांची, सोनिया गांधींची कार्यपद्धती कधीच आवडली नाही. म्हणुन मी त्यांच्याविषयी अपशब्द वापरले नाहीत. किंवा बरेचसे भाजपा समर्थक अपशब्द वापरताना दिसत नाहीत. मग हे शिवसैनिकच असे का करतात. असं करू नये हे त्यांना कुणीही कधीही समजावून सांगितलं नसणार. हा लेख लिहिताना माझ्या मनात केवळ अशा वाट चुकलेय मित्रांना समजावून सांगणं हाच या लेखाचा हेतु.

    ReplyDelete
  24. अजिंक्य ससाणे12 October 2014 at 16:00

    तुम्ही खुप छान आणि नेमकं लिहिता.

    ReplyDelete
  25. अजिंक्य प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक आभार. असेच भेटत रहा.

    ReplyDelete
  26. शेंडगेसाहेब तुमचे विचार ब्लॉगवर वाचले.(फेसबुकवरची शिवसेना ).मी हाडाचा शिवसैनिक आहे. तुमचे विचार वाचून प्रतिक्रिया देणे हे मी माझे कर्तव्य समजतो.मी ब्लॉगवर नेहमी नसतो, कधीतरी असतो. तुम्ही ज्यांना देशाचा पंतप्रधान म्हणवता ते महाराष्ट्रात काय करत आहेत? त्यांनी देशाचा कारभार हाकावा दिल्लीत. एका राष्ट्राचा प्रमुख जर त्याच देशातील एका राज्यासाठी मतं मागत असेल तर ती गोष्ट लज्जास्पद नाही का? भाजपला ह्या गोष्टीची जाण नाही का? आम्ही शिवसैनिक या देशाचे नागरिकही आहोत आणि देशाचे नागरिक म्हणून अशा पंतप्रधानांविषयी चीड निर्माण होणे क्रमप्राप्तच आहे.आणि त्यातूनच आम्ही त्यांच्यावर टिका करतोय.आम्ही देशाच्या पंतप्रधानावर टीका करत नाही आहोत तर महाराष्ट्राच्या सत्तेसाठी झोळी पसरून मतं मागणार्या नरेंद्र मोदी नामक व्यक्तीवर टीका करत आहोत.
    देशाचा पंतप्रधान जर भाजपचा नेता बनून एका राज्यासाठी मतं मागायला आला तर त्याच्यावर आम्ही टीका करायची नाही की पंतप्रधान आले म्हणून लाल गालिचा अंथरायचा? शेंडगेसाहेब संस्कारच द्यायचे असतील तर त्या नरेंद्रभाई मोदी आणि भाजपवाल्यांना द्या.भाजपवाल्यांना सांगा भारतासारख्या संघराज्याच्या प्रमुखाला मतं मागवत फिरवू नका.भाजपचा नेता म्हणून मतं मागायला याल तर टीका भाजपचा नेता म्हणूनच होणार. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सन्माननीय पंतप्रधान म्हणून यावे.स्वागत असेल.
    आम्ही ज्या संस्कारात (बाळासाहेबांच्या )वाढलो तिथे एक घाव दोन तुकडे करायचे शिकवलय त्याच संस्कारातून आम्ही टीका टिप्पणी करणार.ज्याने त्याने आपापल्या पध्दतीने विचार करावा.आम्ही कशी भाषा वापरायची ते आम्ही ठरवणार.कुणाला काहीही वाटो.
    आणि ह्या भाजपवाल्यांना अफजलखानाची सेना म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?देशाचा कारभार करण्यासाठी आम्ही तुम्हाला दिल्लीत पाठवलं त्यात महाराष्ट्राचा सुध्दा वाटा आहे. शिवसेनेची सुध्दा मेहनत आहे आणि फक्त आमची मतंच आम्हाला मिळाली (शिवसेनेची नाही )असं मानल्यासारखं अख्खं मंत्रीमंडळ एका राज्याच्या सत्तेसाठी मतं मागत फिरतय.देशाचा कारभार करायचा सोडून मतं मागत काय फिरता?
    शेंडगेसाहेब प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं.आम्ही शिवसैनिक जी भाषा आणि टीका करतो आहोत ते एक निवडणूकीचं युद्ध आहे.तुम्हाला ती भाषा कळणारही नाही आणि पचनीही पडणार नाही.पहेलवानी करताना अंगाला माती लागेल की काय याची चिंता करत बसलो की कुस्ती हरलोच म्हणून समजा.
    इतर सार्या पक्षांविषयी चिंता करत बसण्यापेक्षा तुमच्या त्या भाजपला जरा थोडी जडीबुटी द्या व देशाच्या पंतप्रधानाला दिल्लीला जाऊन राज्यकारभार करायला सांगा.भाजपचं देशातील एकंदर चारित्र्य पाहता भाजप किती धुतल्या तांदळासारखा आहे ते दिसून येतं.
    शेंडगेसाहेब ही निवडणूकीची लढाई आहे.ह्या लढाईच्या गदारोळात तुम्ही पडूच नका,नाहीतर नस्ता मनस्ताप होईल डोक्याला.शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी,मनसे,कॉंग्रेस ह्यांना त्यांच्या पध्दतीने लढू द्या.निकाल द्यायला जनता समर्थ आहे.....जय हिंद जय महाराष्ट्र.

    ReplyDelete
  27. बबनजी, स्पष्ट आणि प्रांजळ प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. तुमच्या लेखाला प्रतिक्रिया दयावी म्हणुन लिहायला बसलो आणि 'शिवसैनिका हे वाच रे !' हा एख लिहिला गेला. कृपया लेख वाचून पुन्हा प्रतिक्रिया मिळाली तर बरे होईल.

    ReplyDelete
  28. लढाई मध्ये आपला खरा शत्रू कोण ज्याला कळत नाही लढाई कदापि जिंकू शकत नाही …. आणि अशी स्थिती शिवसेनेची आणि मनसेची झाली आहे . … भाजप ला अफजल खानची फौज म्हणायची आणि त्याच फौजेत आपला सेनापती आहे (अनंत गीते ) हे विसरायचे …. हे काय विकास करणार …. हवालदिल झालेली सेना एवढेच म्हणेन …। शिवसेना सैरभैर झाली आहे हेच खरे.मुळात भाजप युती तोडणार नाही आणि आपल्याला मोदींची लाखो मते मिळवता येतील या स्वप्नात ते होते. पण आम्हाला "तुमच्या हरणाऱ्या जागा द्या आणि युती टिकवा हे सुद्धा सेनेने झिडकारले.

    ReplyDelete
  29. सुजीत पुढचे दोन्ही लेख तुझ्यापर्यंत पोहचेलेले दिसत. नाही नाही म्हणता उद्धव पिता पुत्र ज्यारीतीने मतदारांसमोर वाकले. स्वर्गीय बाळासाहेबांना सुद्धा जाहिरातीतनं बोलतं केलं त्यावरून शिवसेना क्तीती सैरभैर झाली दिसतं आहेच. पण आपली सत्ता येणारच नाही आणि वेळ आलीच तर आपल्याला भाजपासोबत जावं लागेल हा साधा विचारही उद्धव ठाकरेंच्या मनाला शिवला नाही. आणि भाजपावर टोकाची टिका करून निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा तो मार्गही त्यांनी बंद करून टाकलाय. तो माणुस किती विचार शुन्य आहे तेच दिसुन येतं आहे.

    ReplyDelete
  30. *विदर्भ वेगळा झाल्यानंतर जी पोरं विदर्भातील उर्वरित महाराष्ट्रात राहील त्यांना नोकरी वरून काढून टाकले पाहिजे आणि कायद्यानुसार स्थानिक ८० टक्के लोक उर्वरित महाराष्ट्रातील घेतली पाहिजे, तेव्हा वेगळा विदर्भ मागल्याची मस्ती उतरेल.

    *विदर्भातील लोक मुंबई पुणे आल्यानंतर त्यांना परप्रांतीय म्हणून हिणवल पाहिजे. आणि दिला न विदर्भ आता कशाला आमच्या नोकर्या घ्यायला आलात असे मुंबई आणि पुणे च्या लोकांनी विदर्भातील मुलांना हिणवल पाहिजे. तेव्हा विदर्भ वेगळा मागितल्याची मस्ती उतरेल.

    *प्रशासकिय सेवेच्या परिक्षेची तयारी करून घेऩार्या संस्था यशदा व SISC सारख्या नामवंत संस्थांमध्ये फक्त महाराष्ट्रातील मुलांनाच प्रवेश दिला जाईल, कारण तिथे दुसर्या राज्यातील मुलांना प्रवेश मिळत नाही तेव्हा विदर्भ वेगळा मागितल्याची मस्ती उतरेल.

    *आता मुंबई पुणे च्या कॉलेज मध्ये खूप सोप्या पद्धतीने अडमिशन होऊन जाते. पण विदर्भ वेगळा झाल्यानंतर विदर्भ हे वेगळ राज्य राहील आणि ती सर्व प्रक्रिय विदर्भातील लोकांना पूर्ण करावी लागेल जी बाहेर राज्यातून आलेल्या मुलांना अडमिशनसाठी करावी लागेल. तेव्हा विदर्भ वेगळा मागितल्याची मस्ती उतरेल.

    *जेव्हा १-२ मार्कासाठी अडमिशन मिळणार नाही तेव्हा विदर्भ वेगळा मागितल्याची मस्ती उतरेल.

    ReplyDelete
  31. पंकजाजी प्रतिक्रियेबद्दल आभार. तुझी प्रतिक्रिया खुप सर्वसमावेशक आहे. हे सगळं विष आहे आणि आपल्या मनात हे नेत्यांनीच कालवलं आहे. पंकजाजी आपण महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा असा स्वतंत्रपणे विचार करण्यात न आपलं भलं आहे न देशाचं. आपण माझे गेल्या म्हीण्य्भ्रतले सगळे लेख वाचावेत. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या मिळतील .

    ReplyDelete