Saturday 31 May 2014

Indian Politics : मतदारांनो जागे रहा विधानसभा येतेय

हा लेख पूर्ण वाचा. शक्य असेल तर बंगालीपासून कन्नडपर्यंत शक्य त्या सर्व भाषांमध्ये भाषांतरीत करा. प्रत्येकाला फोरवर्ड करा. स्थानिक पक्षांचा स्वार्थ आणि त्यांचं जनहिताच्या आड येणारं राजकारण मोडीत काढा. 

काँग्रेस म्हणतं, ' आमचा पक्ष निधर्मी आहे आणि भाजपा जातीयवादी आहे. ' पण स्वतःला निधर्मी म्हणवणारी काँग्रेस शाही इमामांच्या पायाशी लोळण घेते आणि मतांची भिक मागते. आणि युपीतले मुस्लिमच काय पण दलितही सपा , बसपाला झुगारून भाजपाच्या पाठीशी उभे रहातात. कारण मतदारांनाही खरे जातीयवादी कोण हे कळून चुकलंय.

तरीही सांगावसं वाटतंय कि शिवसेना काय , मनसे काय , तृणमूल काय , सपा काय,  बसपा काय , जदयु काय आणि द्म्रुक काय. हे कोणतेही पक्ष जनतेच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी जन्माला आलेले नाहीत.

How to get blog post in your email : आवडलेला ब्लॉग तुमच्या इमेलशी कसा जोडाल ?

मित्रहो,

खरंतर कोणत्याही ब्लॉगचा अड्रेस आपल्याकडे नसतो. काहीतरी सर्च करताना Google search च्या माध्यमातून अथवा मराठी विश्व, मराठी ब्लॉग जगत , मराठी ब्लॉग्स , मराठी ब्लॉग लिस्ट अशा मराठी ब्लॉगच्या डिक्श्नरीच्या माध्यमातून आपण अनावधनाने एखाद्या मराठी ब्लॉगवर पोहचतो. तो ब्लॉग आपल्याला खूप आवडतो. चार आठ दिवसांनी पुन्हा त्या ब्लॉगवर आपल्याला काही नविन मिळतंय ते पहायचं असतं. पण त्या ब्लॉगचा अड्रेस आपल्याला आठवत नाही. मग Google search अथवा वर दिलेल्या मराठी ब्लॉगच्या डिक्श्नरीच्या माध्यमातून तो ब्लॉग आपण शोधू पहातो.

यातून आपल्याला हवा असलेला ब्लॉग पुन्हा सापडेलच याची शाश्वती नसते.

Email Subcription Means What ?

Dear Friend's,

Some time you reach to some blog through  Google search through Marathi blog directories like   मराठी विश्व, मराठी ब्लॉग जगत , मराठी ब्लॉग्स , मराठी ब्लॉग लिस्ट . You like that blog. And after some days you like to go on that blog for new post. But you don't have address of that blog with you and it very difficult to reach to blog you want with searching through Google search.

Friday 30 May 2014

Dance By Blind Girls : अंध मुलींचं नृत्य

या फोटोवरूनच लक्षात येईल कि या अंध मुलींना मिळालेला प्लटफोर्म किती मोठा होता ते. दृष्टी नसलेल्या या मुलींना नावंही नव्हती. म्हणजे इतर कलाकारांची नावं जशी रसिकांपर्यंत पोहचली तशी त्या मुलींची पोहचली नाहीत.     

हा व्हीडीओही मी नेहमीप्रमाणे माझ्या मोबाईलने शूट केलाय. त्यामुळे क्लोजप घेता आले नाहीत. शिवाय लाईटसचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता. आपले साधे कॅमेरे या लाईटस समोर दिपून जातात. पण तरीही त्या मुलींच्या नृत्यातली सुसूत्रता या व्हीडीओतून नक्कीच समजेल. ' आईचा जोगवा  ' या गाण्यावर केलेलं हे नृत्य. खुप एनेर्जेटिक. हवी असलेली एनर्जीही त्या मुलींच्या नृत्यात ठासून भरलेली होती.

Thursday 29 May 2014

Indian Politic and Nareandra Modi : मोदी नाटकी आहेत ?

भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक होती. या बैठकीसाठी मोदी संसद भवनाच्या प्रवेशद्वाराशी आले . संसद भवनाच्या पायरीशी नतमस्तक झाले. वाजपेयींच्या आठवणीने गहिवरले,  आडवानींच्या उपकाराच्या  भाषेने गदगदले. एकीकडे मिडियाचे कॅमेरे हे सारं चित्रित करीत होते आणि दुसरीकडे समीक्षक , राजकीय विश्लेषक 'हे नाटक तर नाही ना ' अशा शंकेनं मोदींच्या या कृतीकडे पहात होते.

Wednesday 28 May 2014

Story For kid's : अक्कलपुरचे अक्कालराव

मित्रांनो,

अक्कलपूर हे गाव जगाच्या नकाशात कुठे आहे हे आम्हाला माहित नाही. सहाजिकच अक्कलराव नावाचे कुणी सद्गृहस्थ त्या गावात असण्याची सुतराम शक्यता नाही.
तरीही अक्कलराव आमच्या स्वप्नात आले. त्यांनी आम्हाला त्यांचं गाव सांगितलं. गाव सांगितलं.  आणखी खुप सांगितलं त्यांनी आम्हाला त्यांच्याविषयी. पण क्षणापूर्वी स्वतःच नाव गाव सांगणारे अक्कलराव काही क्षणात पुन्हा स्वतःच नाव विसरून जातात. 

अक्कालरावांच्या अशा खुप गंमती जंमती मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली हि एक त्यांच्या शाळेत जाण्याची आणि अभ्यासाची गंमत  -

Monday 26 May 2014

Funny SMS : जेव्हा तू मेसेज करत नाहीस तेव्हा

sms 1  
 
जेव्हा तू मेसेज करत नाही
तेव्हा मला खूप राग येतो
कधी कधी वाटतं
पायातली चप्पल काढून

Thursday 22 May 2014

Sex of Snakes : सापांचा शृंगार

मी अनेक प्राण्यांचा समागम खूप जवळून पाहिलाय. पण सापाची नर आणि मादी एकमेकांशी ज्या ओढीनं रत होतात ती ओढ आणखी कुणातही पहिली नाही.  मी माझ्या शेतातल्या विहिरीजवळ केलेलं हे चित्रण.  लेख वाचाच पण चित्रीकरण पूर्ण पहा. कारण चार मिनिटांच्या या चित्रिकरणातले दोन मिनिटं सापांच्या जवळ पोहचून योग्य ती पोझिशन घेण्यात गेले आहेत.

Wednesday 21 May 2014

Indian Politics : उद्धवा जमिनीवर ये

दहा मेला शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडण्यापूर्वीच मी ' मोदीच बहुमताने सत्तेवर येतील ' असं भाष्य माझ्या ' मोदीच सत्तेवर येतील ........ पण कसे ?'   या लेखातून केलं होतं.

मी कोणी फार मोठा राजकीय विश्लेषक नाही. पण भोवतालच्या परिस्थितीचं बारकाईन निरीक्षण निश्चित करतो. त्यामुळेच मोदीच सत्तेवर येतील हा माझा अंदाज बराचसा बरोबर ठरला.

कुठं आहे मोदींची लाट ? असं म्हणत वाळूत मान खुपसणारे सारेच शहामृग

Tuesday 20 May 2014

Mrathi poem : माझ्या मराठी देशाला


हिंदुस्तानच्या सिमेपल्याड जाऊन जगभरात वास्तव्या करणाऱ्या............ इंग्लिशस्तानच्या मातीवर माय मराठीची छाप सोडणाऱ्या.......... इंग्रजीवर मराठी मोहर उमटविणाऱ्या माझ्या ब्लॉगच्या रसिक वाचकांना लेखकांना आणि समुद्रापलीकडे असूनही मराठीवर प्रेम करणाऱ्या मराठीशी असलेले ऋणानुबंध जपणाऱ्या तमाम रसिकांना माझी हि कविता अर्पण.

Monday 19 May 2014

Love Poem: अन तुझ्या बाहुत येता

ती आपल्या आयुष्यात येते आणि आपण हरखून जातो. ती असते आपल्या काळजाचा ठोका………ती आपल्या हृदयाची स्पंदनं. आपल्याला हवी तशी ती आपल्या आयुष्यात आली कि आपल्या मनातला झोका आपल्याही नकळत आभाळाला जाऊन भिडतो. आपल्याला आभाळ अगदी आपल्या कवेत आल्यासारखं वाटू लागतो. कालपर्यंत जमिनीवर असणारा आपल्या स्वप्नांचा झोका असा आभाळात न्यायला कारणीभूतही तीच असते.

Monday 12 May 2014

Story For Kid's : राक्षस गेला शाळेमध्ये

मुलांनो,
तुम्हाला माहिती आहे का कि काल आमच्या राक्षसपुरचा राक्षससुद्धा शाळेत गेला होता. 

खोटं नाही सांगत आहे. खरंच, अगदी देवाशप्पत.

कशाला म्हणून काय विचारताय ?

तुम्ही कशाला जाता शाळेत ?

बरोबर ! शिकून मोठ्ठ व्हायला. हो कि नाही.

आमच्या राक्षसरावांना म्हणे बाराखडी आणि अंकलिपी शिकायची होती.

Saturday 10 May 2014

Indian Politics and Narendra Modi : मोदीच सत्तेवर येतील ........ पण कसे ?


झालं. आज प्रचाराच्या शेवटच्या तोफा थंडावतील. दोन दिवस धुरळा खाली बसल्यासारखा वाटेल. बारा तारखेचं मतदान पार पडलं कि झालं. मिडिया सरसावून बसलेलं आहेच. त्यांनी आजच जाहीर करून टाकलंय कि बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून एक्झिट पोलचे निकाल पाहण्याच्या तयारीत राहा. सोळा तारखेला मतमोजणी आणि ...........

Hollywood film 127 hours : जगण्याची उमेद आणि १२७ तास

Aron’s Ralston ची भूमिका करणारा James Franco
Aron’s Ralston ची भूमिका करणारा James Franco
प्रत्येकानं वाचायलाच हवा असा लेख. एका गिर्यारोहकाच्या आयुष्याची वास्तववादी कहाणी.

आपण जगतो कशासाठी ? हा प्रश्न मलातरी नेहमीच पडतो. तळहाता एवढा जीव घेऊन जन्माला यायचं. दाही दिशांनी वाढायच. लग्न करायचं. पोरं जन्माला घालायची. दोन वेळच्या अन्नासाठी हुजरेगिरी करायची. किडूकमिडूक जमवायचं. त्याला इस्टेट म्हणायचं आणि आपण मेल्यानंतर लोक काय म्हणतील म्हणून अप्तांनी एक सोन्याचा मनी बंद ओठात सरकवायचा. अग्नीच्या ज्वाळांनी आपल्याला लपेटलं कि आपली राख व्हायची. आणि आयाबायांनी " सोनं झालं गं बाई बाबाचं " म्हणत हळहळ व्यक्त करायची.

Friday 9 May 2014

Love poem : प्रेम कशात आहे ???

प्रत्येकाला असं  वाटत कि मला सारं काही कळतं .पण आपण खूप अज्ञानी असतो. प्रेम कशात आहे !!!!
तर इतरांना समजावून घेण्यात. पण हे कुणालाच कळत नाही. हे आपल्याला कळत नाही म्हणूनच आपण रंग, रुप ऐश्वर्य , धन - दौलत अशा बाह्य आणि नश्वर गोष्टींवरच प्रेम करतो. जेव्हा ' इतरांना समजावून घेणं म्हणजेच प्रेम ' हि व्याख्या आपण स्विकारतो तेव्हा रंग, रुप ऐश्वर्य , धन दौलत अशा बाह्य आणि नश्वर गोष्टींच्या अस्तित्वाची जाणीवही आपल्याला उरत नाही. जेव्हा इतरांना समजावून घेणं म्हणजेच प्रेम हि व्याख्या आपण स्विकारतो तेव्हा माणूस या एकाच सजीवावर प्रेम न करता आपण प्रत्येक सजीवावर प्रेम करू शकतो. मला फेसबुकवर मिळालेली हि गोष्ट. घेण्यासारखी.

Friday 2 May 2014

Love Poem : तिचं हसू

ती आपल्या आयुष्यात येते.........तिचं हसू आपल्यावर उधळून देते.........आणि आपण ???????????
.........आपण आपले उरतच नाही मुळी.

त्यानंतर एकच आस...........सगळीकडे तिचे भास............सोबतीला तिचा श्वास.................वैशाखातही श्रावणमास.

तिचं हसू असतं...............अगदी इवलसं...........तिच्या ओठांच्या दोन कोपरयात मावणारं.............पण आपल्या आयुष्यातलं सारं आभाळ व्यापणार.