Sunday 7 August 2016

किती जणांना कळतो मैत्रीचा अर्थ ? ( How many people knows what is friendship? )


Friendship, Friendship day

मैत्री विषयी आजकाल कुठून कुठून खूप ऐकायला मिळतं. खूप सुंदर असत ते. whats aap सारख्या प्लॅटफॉर्मवर तर या विषयावर रोज आख्यानं झडतात.

आज लिहायला उशीर झालाय. माझ्या ब्लॉगलाहि अनेकांनी भेट दिली. इकडं तिकडं पोस्ट करण्यासाठी मैत्री विषयी काही सापडतय का ते पाहिलं. म्हणून बसलो लिहायला.


जन्माला आल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत असंख्य माणसं आपल्या आयुष्यात येतात मी मुद्दाम माणसं म्हणतोय. कारण यातले सगळेच आपले मित्रं नसतात. काही काठावर उभे राहून आपली मैत्री जोखतात, पचनी पडली तर हात देतात नाहीतर खातो आपण गटांगळ्या.

मग या असंख्य माणसांमधले आपले खरे मित्र आपण कसे ओळखायचे ? माझ्या मते तुम्हाला प्रत्येक पावलाला समजावून घेतो तो आपला खरं मित्र.

यातही आपले शाळकरी मित्र आपल्याला नेहमीच सर्वात अधिक जवळचे वाटतात. आयुष्याच्या इतर टप्प्यावर भेटणारेही अनेकजण मित्र होतात. पण त्याला स्पर्धेची एक झालर असते.

जिथं स्पर्धा नसते ती मैत्री सर्वात निकोप असते. आणि स्पर्धा असतानाही टिकून रहाते ती मैत्री सर्वश्रेष्ठ.

असो मला फार मोठं आख्यान द्यायचं नाही. मैत्री विषयी या काही ओळी आवडल्या तर नक्की शेअर करा.

एक मात्र नक्की खऱ्या मैत्री इतका सुंदर नात जगात दुसरं नाही. खरी मैत्री मला लिमलेटच्या गोळीसारखी वाटते. चघळून खा नाही तर दाताखाली फोडून खा. तिची चव बदलत नाही. त्यातूनच सुचलेल्या या ओळी -     

मैत्री असते नेहमी
खूप साधी भोळी
मैत्री म्हणजे लिमलेटची
हवीहवीशी गोळी

मैत्री असते तुमच्यासारखी
गोड आणि खट्याळ
मैत्री असते आयुष्यातली
सोनेरी सकाळ.

No comments:

Post a Comment